मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती औरंगाबाद दौऱ्यादरम्यान गुन्हेगारांचा गराडा असलेला एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमुळे अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ भडकल्या आहेत. ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, अशा आशयाचे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका केली आहे.
अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असताना गुन्हेगारांनी पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्वागत केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. कलाम कुरेशी, सय्यद मातीन आणि जफर बिल्डर हे गंभीर गुन्हे असलेले तिघेजण फोटोत पाहायला मिळत आहेत. देशमुख यांच्यासोबत फोटो काढलेल्या तिन्ही गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एक गुटखा किंग, तर दुसरा ट्रक चोर असून तिसऱ्या आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.
यामुळेच चित्रा वाघ संतापल्याचे पाहायला मिळतय. ‘गुन्हेगारांना “शक्ती” देण्याची मोहीमच जणू गृहमंत्र्यांनी उघडलीये. अन्याय अत्याचारग्रस्त महिलांची भेट घेण्यास त्यांचे सात्वंन करण्यास गृहमंत्र्यांना वेळ नाही पण गुन्हेगारांना बळ देण्यास मात्र तत्पर. हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, असे म्हणत चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांच्यावर तोफ डागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रोहयो घोटाळा प्रकरणात ४७० जणांना नोटीसा; २० पथकांनी केली होती चौकशी
- या अर्थसंकल्पामुळे लोकांच्या राहणीमानात सुलभता येईल : मोदी
- २३ वर्षीय नंदिनी सलोखे ठरली महाराष्ट्राची ‘सुवर्णकन्या’
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- शेतकऱ्यांना रोखताय की संपवताय? शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड


