🕒 1 min read
चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. श्रीलंकेविरुद्धची सीरिज 2-0 अशी जिंकत इंग्लंडची टीम भारतामध्ये दाखल झाली. खेळाडूंचा ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, खेळाडू आऊटडोअर आणि नेटमध्ये सराव करू शकणार आहेत. मालिकेतील पहिले दोन्ही सामने चेन्नईतील चेपॉक मैदानावर होणार आहेत. त्यानंतरचे दोन्ही सामने अहमदाबाद इथं होणार आहेत. कसोटी मालिका ८ मार्च रोजी संपणार असून, १२ मार्चपासून टी-२० आणि २३ मार्चपासून वन-डे मालिका खेळविली जाणार आहे.
भारतीय संघाने आजपासून (१ फेब्रुवारी) सरावाला सुरुवात केली आहे तर, इंग्लंड संघ उद्यापासून सरावासाठी मैदानात उतरेल. तत्पूर्वी, इंग्लंड संघाचा फिरकीपटू जॅक लीचने मालिकेआधी रणशिंग फुंकले आहे. आम्हाला भारतीय संघाची कमजोरी माहित आहे, असे त्याने म्हटले.
सध्या इंग्लंडचा अव्वल कसोटी फिरकी गोलंदाज असलेला लीच आगामी मालिकेसाठी कमालीचा उत्सुक आहे. लीचने मालिकेविषयी बोलताना म्हटले, ‘मी माझ्या बलस्थानांवर गोलंदाजी करेल. मॉन्टी पानेसर व ग्रॅहम स्वान यांची गोलंदाजी पाहणे मला आवडते. मी त्यांच्यापासून बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करतो. मॉन्टीने २०१२ च्या भारत दौऱ्यावर काहीशी वेगाने गोलंदाजी करत यश मिळवले होते. मी कदाचित त्या वेगाने गोलंदाजी करणार नाही. वेगात विविधता राखण्यात यशस्वी झालेले अनेक गोलंदाज मी पाहिले आहेत. आम्ही भारतीय संघाच्या कमजोरीचा अभ्यास केला आहे.’
इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असणार आहे. भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही कसोटी मालिका महत्त्वाची असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अर्थसंकल्पात देशवासियांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती,मात्र …’
- इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी भारताच्या माजी सलामीवीराने निवडली प्लेईंग इलेव्हन
- या अर्थसंकल्पामुळे लोकांच्या राहणीमानात सुलभता येईल : मोदी
- शेतकऱ्यांचा एल्गार; 6 फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’चा इशारा
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
