Share

गीतानं सांगितला डिलिव्हरी रूममधला हरभजनचा अजब किस्सा

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटु हरभजन सिंग दुसऱ्यांदा बाबा झाला. त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसराने मुलाला जन्म दिला आहे. या दांपत्यांना यापुर्वी हिनाया नावाची एक मुलगी आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटु हरभजन सिंगच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. हरभजनची पत्नी गीता बसराने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. हरभजन सिंगने ट्विट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. आयपीएल दरम्यान हरभजन आणि गीता बसरा हे दोघे एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर २०१५ मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नानंतर एका वर्षातच त्यांना हिनाया नावाची मुलगी झाली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्जार्ज मिळाल्यानंतर हरभजनची पत्नी गीता आणि बाळ घरी आले आहेत. बाळाच्या स्वागताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. यादरम्यान गीताने हरभजनबाबत एक चकित करणारी माहिती दिली आहे. बाळाचा जन्म होत असताना हरभजन डिलिव्हरी रूममध्ये चक्क फोटो काढत होता.

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गीताने याबाबतचा खुलासा केला आहे. गीताने सांगितले की, ‘डिलिव्हरी रूममध्ये हरभजन माझासोबतच होता. परंतु तो माझ्याकडे लक्ष देण्याऐवजी फोटो काढण्यात मग्न होता. जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा तो आनंदानं नाचू लागला. जोरजोरात गाणी गात होता. दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्यापासून हरभजन अगदी लहानमुलांसारखाच वागू लागला आहे.” असं गीताने म्हंटल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!