नवी दिल्ली- वरिष्ठ व्हायरॉलॉजिस्ट डॉ शाहिद जमील यांनी रविवारी भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या वैज्ञानिक सल्लागार ग्रुपच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला आहे. शाहिद जमील हे केंद्र सरकारने बनविलेल्या एका खास सल्लागार समितीचे सदस्य होते, त्यांच्यावर व्हायरस जीनोम स्ट्रक्चरची ओळख पटविण्याची जबाबदारी होती.
शाहीद जमील हे अशोक विद्यापीठातील ‘त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्स’चे संचालकही आहेत. डॉ. शाहिद जमील यांनी ग्रुपचं अध्यक्षपद का सोडलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र काही वृत्तानुसार कोरोनाबाबत सरकारच्या धोरण आणि तयारीवर ते समाधानी नव्हते असं सांगितले जात आहे . ‘आपण राजीनामा दिला आहे, तसंच या प्रकरणात आता काहीही बोलण्यासारखं उरलेलं नाही’, अशी प्रतिक्रिया शाहीद जमील यांनी दिलीय.
जामील हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ असून ते या करोनाच्या साथीसंदर्भात मुक्तपणे आपली मतं मांडत असतात. नुकताच शाहिद जमील यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आणि म्हटले की देशातील शास्त्रज्ञांना पुराव्यावर आधारीत धोरण बनविण्याच्या जिद्दीने प्रतिक्रियेचा सामना करावा लागत आहे. सरकारने वैज्ञानिकांचा सल्लादेखील मान्य न केल्याचा आरोप त्यांनी यी लेखात केला आहे.
यासह त्यांनी लेखात असेही म्हटले, “मोदी सरकारने देशातील शास्त्रज्ञांचे म्हणणे, मतं देखील ऐकले पाहिजे आणि धोरण बनवण्याच्या बाबतीत हट्टी वृत्ती सोडली पाहिजे. धोरण बनवण्यासाठी विज्ञानावर देखील लक्ष केंद्रित करायला हवे, मात्र ते झाले नाही याची मला चिंता वाटते. पण माझे कार्यक्षेत्र किती आहे हे मला माहित आहे असे त्यांनी म्हटले होते.
जामील यांनी अशाप्रकार तडकाफडकी राजीनामा देणं हा सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, या राजीनामा प्रकरणावर सरकारच्यावतीनं यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संपूर्ण देश एकजूट आहे,किती लोकांना मोदीजी अटक करणार ते बघुयाच’
- अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘हा’ षटकार पाहून तुम्हाला येईल धोनीची आठवण…
- ‘दिलेले वचन केले पूर्ण’, ट्विंकल खन्नाने दिल्ली आणि पंजाबमध्ये पाठवले ऑक्सिजन कंसंट्रेटर
- तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा,अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणची कसरत
- #तोक्ते चक्रीवादळाचा कोल्हापूरलाही फटका; घरांसह शाळांचे छत उडाले, लाखोंच नुकसान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

