दिल्ली : कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना भारतात देखील आता त्याचा कहर सुरु आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटी आणि नेते मंडळी सध्या त्रस्त आहेत. पण आता कोरोना कोणामुळे जास्त पसरतोय याच्यावरून राजकारणात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. भाजपा खासदार आणि भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं मंगळवारी दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम आमदी पार्टीच्या सरकारवर टीका करताना गंभीरनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पहिल्या दिवसापासून खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे.
गंभीरनं CNN-News18 ला विषेश मुलाखत दिली त्यावेळी तो बोलत होता. ‘दिल्ली सरकार कोरोना व्हायरसची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहे. केजरीवाल स्वतःची जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करत राहिले, मुख्यमंत्र्यांनी 30000 बेड्सची व्यवस्था केल्याचे जाहीर केले होते, त्याचं काय झालं? ते प्रत्येक दिवशी नंबर बदलत आहेत. दिल्ली सरकार पहिल्या दिवसापासून खोटं बोलत आहेत. त्यांना कोणती जबाबदारी घ्यायची नाही. ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे,”असे गंभीर म्हणाला.
स्थलांतरीत मजूरांच्या प्रश्नावरूनही गंभीरनं दिल्ली सरकारवर टीका करत असताना केरळ सरकार आणि क्राँग्रेसच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारचे कौतुक केले. म्हणाला ‘या दोन्ही सरकारनं कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली. दिल्ली सरकारने जबाबदारी घ्यायला हवी होती. त्यावेळी दररोज 1 लाख लोकांची काळजी घेत असल्याचा दावा दिल्ली सरकारकडून करण्यात आला होता, परंतु 25 लाख लोकांनी दिल्ली सोडलं आहे. दिल्ली सरकार काळजी घेत असताना त्यांनी दिल्ली का सोडलं? त्यांच्याकडे निधीच शिल्लक राहिलेला नाही. निवडणुकीपूर्वी त्यांनी सर्व मोफत सुविधा दिल्या. आता पैसाच शिल्लक राहिला नसल्यानं त्यानी डिसेल, पेट्रोल आणि मद्यावरील टॅक्स वाढवला’.
गंभीरनं यावेळी दिल्ली सरकारसाठी पुन्हा मदतीचा हात पुढे केला. तो म्हणाला,”तुम्हाला मदत हवीय, तर आम्ही सर्व क्षमतेनं करण्यास तयार आहे. मी त्यांना सर्वप्रथम खासदार फंडातून 1 कोटींची मदत केली. दिल्ली हॉस्पिटल्सची परिस्थितीची मला कल्पना होती. त्यामुळे मी त्यांना PPE किट दिले. पण, दिल्ली सरकारलाच आमच्यासोबत काम करायची इच्छा नाही”.
ही शिवसेना बाळासाहेबांचीच, पण शब्द न पळणारी भाजपा वाजपेयींची राहिली आहे का ?
शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात जितेंद्र आव्हाडांपेक्षा जास्त आदर – चंद्रकांत पाटील
बळीराजाचे अश्रू पुसताना दिलेले आश्वासन ठाकरेंनी पाळले नाही – शेट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

