मुंबई : राज्यात सध्या सत्तेत असणार्या शिवसेनेने भाजपबरोबर गद्दारी केली आणि ही बाळासाहेबांचीच शिवसेना आहे का, असा प्रश्न पडला असल्याची घणाघाती टीका केंद्रीय संरक्षणमंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंह यांनी शिवसेनेवर केली होती. आता शिवसेनेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या शिवसेनेवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शिक्षकांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष, महाराष्ट्र टीचर असोसिएशनने पुकारला एल्गार
ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे. मात्र, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का? असा प्रश्न विचारत अरविंद सावंत यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं. तुम्ही परवा बिहारचा बिगुल वाजवला आणि 70 हजार एलईडी लावून प्रचार सुरु केला. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नये. ही राजकारणाची वेळ नसल्याचं सांगत पीएम केअर फंडाचं काय झालं, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
पिंपरी-चिंचवड : पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल
“तुम्ही राजकारणात व्यापार मांडलाय. तो पहा मध्यप्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर कर्नाटकात तुम्ही काय केलं. तुम्ही अंतर्मुख झालं पाहिजे. आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतो की हा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा भाजप आहे का? शिवसेना आणि सत्ता असं काही नाही. सत्ता हे आमचं साधन आहे साध्य नाही. वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तशीच आहे. त्याच विचारांनी काम करत आहे.” अस अरविंद सावंत म्हणाले आहेत.


