टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आहे. मात्र सरसकट कर्जमाफी करू म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक केल्याची भावना आता शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पहिली प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘कर्जमाफीच्या योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आल्याने शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, ‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मी तुम्हाला पूर्णपणे चिंतामुक्त आणि कर्जमुक्त करतो असं आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आश्वासन पाळलं नाही असे शेट्टी म्हणाले.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘निकषांच्या मुद्द्यावरून आमच्या कर्जमाफीवर आक्षेप घेतला गेला, पण या कर्जमाफीलाही निकष आहेत. २ लाख कर्ज थकलेला शेतकरी उरलाच नाही, मग कोणाची कर्जमाफी करणार? असा सवाल पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

