🕒 1 min read
नवी दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला एक महत्वाचा सल्ला दिला आहे. गंभीरच्या मते चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2021 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरल्यास कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चौथ्या क्रमांकावर खेळले पाहिजे.
गौतम गंभीरच्या मते, ‘चेन्नई प्लेऑफसाठी पात्र ठरेल तेव्हा धोनीने चौथ्या क्रमांकावर खेळले पाहिजे. CSK लक्ष्याचा पाठलाग करत आहे किंवा स्कोअरचा बचाव करत आहे हे महत्त्वाचे नाही. मला आशा आहे की ते असच करतील.’ कर्णधारासाठी चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला कोणासोबत फलंदाजी करायची आहे याचा विचार आपण करू शकतो.
गंभीर पुढे म्हणाल, ‘चेन्नईचा संघ क्रमांक 3 आणि क्रमांक 4 वर नेहमी धावा करत नाही. तुम्हाला थोडी अधिक फलंदाजी करणे आवश्यक आहे. तुम्ही प्लेऑफसाठी पात्र व्हाल परंतु असं व्हायला नको की पूर्ण जबाबदारी तुमच्यावर येइल, तुम्ही विकेट लवकर गमावता आणि नंतर तुम्हाला लवकर येऊन धावा काढाव्या लागतात’
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच; राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव
- मनिष पांडेनं भर मैदानात केले ‘हे’ कृत्य; सगळीकडे होतेय थू-थू ची चर्चा
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
