लातूर: कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत, हे होऊ नये यासाठी शहरात घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासंबंधी तातडीने मास्टरप्लॅन सादर करावा. तसेच या प्लॉनची महापालिकेने तातडीने व्यवस्था करुन तीन महिन्यात उपाय योजना कराव्या, असं पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले.
कोरोना महामारीमुळे प्रत्येक व्यक्तीने काही ना काही गमावले, यात अनेक जणांनाचे ऑक्सिजन अभावी मृत्यु ही झाला. परंतु असं पुन्हा होऊ नये यासाठी लातूर शहरात घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासंबंधी तातडीने मास्टरप्लॅन सादर करुन उपाय योजना उभारव्यात तसेच अभ्यासाअंती महापालिकेने त्यास मंजुरी दिल्यानंतर अशोका गॅस कंपनीने कामास तातडीने सुरुवात करून तीन महिन्यात ते पूर्ण करावे, असे अमित देशमुख म्हणाले.
तसेच येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत प्रत्यक्ष गॅस पुरवठा होईल यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी कार्यवाही सुरू करावी या उपक्रमामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरवडा सुरळी होऊन रुग्णांनचे प्राण वाचतील, असे निर्देश लातूर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासन, महापालिकचे पदाधिकरी,अधिकारी आणि गॅस कंपनीचे अधिकार यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं…’ रिया चक्रवर्तीच्या पोस्टवर अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
- ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार
- “राज्यसरकार व प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या लपवत आहे, याचा भांडाफोड १ जूनला करणार”, आ. निलंगेकरांचा इशारा
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- ‘मिर्झापूर’ मधील अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट?; ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

