गंगापूर : गंगापूर शिक्षण विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक युवराज रामकोर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी बुधवारी (दि.२१) निलंबित केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी संबंधितावर कारवाई करण्या संदर्भात अनेक तक्रारी केलेल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
युवराज रामकोर हे पाच वर्षांपासून गंगापूर शिक्षण विभागात कार्यरत होते. शिक्षकांची कामात अडवणूक करणे, अरेरावीची उद्धट भाषा वापरणे, कार्यालयात नेहमी गैरहजर असणे याबाबत विविध शिक्षक संघटनांनी तसेच गंगापूर गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधिताबाबत विनापरवानगी गैरहजर राहणे, कार्यालयीन कामात अनियमितता, अभिलेखे अद्यावत न ठेवणे, गैरहजर असताना उपस्थिती पटावर स्वाक्षरी करणे, शिष्यवृत्ती रकमा प्रलंबित ठेवणे, रोकड वही अद्यावत न ठेवणे याबाबत जिल्हा परिषदेस अहवाल सादर केलेला होता.
रामकोर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला होता. संबंधिताचा खुलासा उशीराने प्राप्त झाला व तो असमाधानकारक असल्याने तसेच संबंधितावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याने व कार्यालय प्रमुखाने वारंवार सूचना, नोटीस देऊनही वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने महाराष्ट्र जि प जि से (शिस्त व अपील) नियम १९६४ चे ३ नुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कुंभेफळ शिवारात युवकाचा गळा चिरून मृतदेह जाळला, संशयीत मारेकरी स्थानिक गुन्हेशाखेच्या जाळ्यात
- ब्रेक द चेनच्या वेळांमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेत ‘हे’ बदल
- दोन गटात फ्रि स्टाईल हाणामारी
- ‘नाशिक दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त, दोषींवर कारवाई होणार’
- रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी


