🕒 1 min read
नाशिक : नाशिक मधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली होती. यामुळे सुमारे दीड ते दोन तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे १२० हुन अधिक गंभीर रुग्ण हे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन वर अवलंबून होते.
ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने २४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून अक्षरशः श्वास घेता न आल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीला नातेवाईक धावून जात त्यांच्या छातीवर दाब टाकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ऑक्सिजन अभावी रुग्णांनी प्राण सोडला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे व गंभीर असल्याने देशाच्या पंतप्रधानांपासून ते इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत.
काही वेळापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये येऊन रुग्णालयाची पाहणी केली आहे. ‘या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी ७ सदस्यीय उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ही समिती झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करेल आणि त्यांनी केलेल्या सूचना SOP म्हणून वापरल्या जातील, असंही टोपे यांनी स्पष्ट केल आहे. या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ असे टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता बारावीच्या परीक्षांबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्या; सुप्रिया सुळेंची मागणी
- ४५ वर्षांनी देशाचा गरीब श्रेणीत पुन्हा समावेश, मोदींनी करून दाखवलं; काँग्रेसची टीका
- पुण्याचे नाशिक होऊ देऊ नका; महापौर मोहळांची सरकारला विनवणी
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी नसेल पण…; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
