🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाचे आज आगमन होत आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या प्रतिष्ठापणेसाठी घरांसह गणेश मंडळही सजली आहे. संपूर्ण राज्यात याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
याच प्रमाणे पुण्यातील जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचं हे 127 वं वर्ष आहे त्यानिमित्त यंदा श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडे आठ वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तसेच सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर सोमवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत आणि कार्यक्रमानंतर दुपारी साडे बारा वाजता भाविकांसाठी दर्शन सुरू होणार आहे. आज गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर पुढील दहा दिवस प्रत्येकजण लाडक्या बाप्पाच्या भक्तीरसात रंगून जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
देश आर्थिक संकटात, २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्क्यांवर घसरला
दीड रुपयाच्या मुखपत्रात हिमालयाची उंची दिसणार नाही, धनंजय मुंडेचा शिवसेनाला टोला
‘राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही’, दानवेंची शिवस्वराज्य यात्रेवर सडकून टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

