Share

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्याची गांधीगिरी; फडणवीसांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना ‘दिवाळी भेट’

Published On: 

उस्मानाबाद : विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सध्या ते उस्मानाबाद मधील विविध ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहेत. या पाहणी दौऱ्यात त्यांना शेतकरी आपली व्यथा सांगत आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, नंतर केंद्राकडे मदत मागावी, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला आहे. या दौऱ्यात एका बाधिक शेतकऱ्यांने देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिवाळी भेट पाठवली आहे.

अतिवृष्टी आणि मांजरा नदीच्या पुराने देवणी तालुक्यातील सोयाबीन पिकाची प्रचंड नासाडी झाली. आम्हा शेतकऱ्यांचे अर्थकारणच बिघडले. नुकसान झालेले सोयाबीन सरकारपर्यंत पोहोचवा, असा टाहो देवणी भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे आणि जिल्हा परिषद सदस्य प्रंशात पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांच्यासमोर फोडला. त्यांनी विरोध पक्ष नेत्यांकडे सोयाबीनचे पँकीग असलेला डबा सुपुर्द केला.

निलंगा तालुक्यातील गौर गावाच्या दौऱ्यात शेतकऱ्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. देवणी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे आणि मांजरा नदीच्या पुरामूळे हजारो हेक्टर खरीप हंगामातील पिकाचे नुकसान झाले आहे. बळीराजाच्या हाती आलेला घास या आस्मानी संकटामूळे हिरावला गेला, बळीराजा हा कायम संकटाच्या गर्तेत आडकतो आहे. आता शेताची मशागत करायची म्हटलं तरी शिवारात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामूळे शेतकऱ्याच्या आरोग्याचा विषय गंभीर झाला आहे. याकडे लक्ष देवुन देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करुन तात्काळ एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ‘मुख्यमंत्र्यांना अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर विरोधीपक्ष नेते म्हणून तुम्ही आमचे दुत व्हा’ अशी विनवणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!