Share

तारण ठेवलेले चार लाख शेअर्सची परस्पर विक्री करून साडे अकरा कोटीचा गंडा

Published On: 

औरंंगाबाद : तारण ठेवलेल्या चार लाख शेअर्सची खोट्या डिलेव्हरी स्लिपच्या सहाय्याने विक्री करून, सहा कंपन्यांनी शहरातील नाथ बायो जीन्स (ई) या कंपनीला जवळपास ११ कोटी ५१ लाख रूपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नाथ बायो जीन्स कंपनीच्या व्यवस्थापकाकडून दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्तीत्व कॅपीटल मार्केट प्रा. लि., जावन मुबारसा, मे. अर्जंट फीनवेस्ट प्रा. लि आणि अंबे सेक्युरिटीज प्रा. लि. कांदिवली (ईस्ट) येथील कंपनीच्या संचालकांनी आपसात कट रचुन ४ लाख शेअर्सची खोटी डिलेव्हरी स्लिप तयार करून, संबंधीतांना कोणतेही अधिकार नसताना, या डिलेव्हरी स्लिपवर सह्या करून इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून विक्री केली. हे व्यवहार २० नोव्हेंबर २०२० पासून ते तक्रार अर्ज देण्यापुर्वी पर्यंत करण्यात आले.

परस्पर शेअर्स विकल्यामुळे नाथ बायो जिन्सचे ११ कोटी ५१ लाख रूपयांची आर्थिक फसवणूक झालेली असल्याची तक्रार कंपनीचे व्यवस्थापक सुनिल दिक्षीत यांनी नोंदविली आहे. या प्रकरणी दिक्षीत यांच्या तक्रारीवरून मे. अर्जंट फिनवेस्ट कंपनी, रोहित अरोरा, प्रदिप कुमार जिंदल, अस्तीत्व कॅपीटल मार्केटचे प्रमोटर हेमंत कुमार गुप्ता, जीवन मुबारसा, सर्व संचालक रा. नवी दिल्ली, यांच्यासह आंबे सेक्युरिटीज प्रा. लि.चे अनुपम गुप्ता, तसेच अभय गुप्ता रा. कांदीवली ईस्ट या सात जणांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे करित आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!