मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णब गोस्वामीसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा न्यूज रुममध्ये दाखल झालेल्या अर्णब गोस्वामी यांनी ‘खोट्या’ प्रकरणात त्यांना अटक केल्याचं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी हल्लाबोल केला.
सर्वोच्च न्यायालयाने अर्णबचा अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर तळोजा कारागृहाच्या बाहेर दुतर्फा तुफान गर्दी झाली होती. जनतेच्या पाठिंब्याला प्रतिसाद देऊन त्यांनी आभार व्यक्त केले. यानंतर अर्णब थेट न्यूजरूममध्येच दाखल झाला.
रिपब्लिक चॅनलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत असलेल्या गोस्वामीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. ‘उद्धव ठाकरे, ऐका माझं. तुमचा पराभव झालाय. उद्धव ठाकरे तुम्ही मला एका जुन्या, खोट्या प्रकरणात अटक केली. आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ आता सुरु झाला आहे.’ असं म्हणत त्याने उद्धव ठाकरेंसह महाराष्ट्र सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका !
- सत्तेसाठी भाजपने नाही तर शिवसेनेनेच विश्वासघात केला – फडणवीस
- ‘मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांना लादणं हा लोकमताचा अवमान’
- पुणे पदवीधर विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला!
- दलाई लामांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा’, माजी मुख्यमंत्र्यांची मागणी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

