लक्ष्मण जाधव : १५ नोव्हेंबर २०१९ रोजी चिनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला तेव्हा कोणालाच साधी पुसटशी पण कल्पना ही नव्हती की हा व्हायरस अवघ्या जगात ऐवढा हाहाकार माजवेल…हा व्हायरस चिन मध्ये फोफावत असताना प्रसार माध्यमातून याच्या बातम्या मिळत होत्या पण याचं क्षेत्र फक्त चिन पुरतेच मर्यादित राहील असं वाटतं होते पण या विचाराला छेद देत कोरोना भारत देशात दाखल झाला बघता बघता महाराष्ट्रातील पुण्यात आढळला आणि सौम्य धक्काच बसला.
सुरुवातीच्या दोन रुग्णांवरून ही संख्या वाढू लागली आणि धोक्याची घंटा स्पष्ट जाणवू लागली खबरदारी म्हणून पुण्यातील काही भागातील शाळा बंद,महाविद्यालय बंद होत्या मात्रा कोरोनाचा वाढता आलेख पाहता प्रशासनाने पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालये,सिनेमाग्रह, नाट्यग्रह, बंद ठेवली काळाची पावले ओळखून या परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट जाणवू लागले आणि पुण्यातून अनेकांनी गावची माती खुणावू लागली.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद मनामध्ये कोरोनाच्या व्यप्ती बद्दलचे असंख्य प्रश्न रेंगाळत असतानाच गावचा रस्ता धरला पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही अनेकांना सतावणारी बाब होती तेव्हा गड्या आपला गावच बरा म्हणून अनेकांची पाऊलं गावाकडे वळली चिन,इटली मधील कोरोनाचे थैमान कोरोना ग्रस्तांची वाढती आकडेवारी सातत्याने मनाला विचार करायला भाग पाडणारी बनत गेली.शहरातील कोरोनाने सोशल मिडियाच्या माध्यमातून गावोगावी ,वाड्या,वस्त्यावरील लोकांच्या मनात घर केलं आणि सर्वत्र कोरोनामय वातावरण बनत गेले सगळी कडे फक्त तीच आणि तीच चर्चा त्यातच भर अफवांची त्यामुळे अडाणी लोक अजून भितीच्या छायेत जगताना दिसतात
बाजारपेठा,यात्रा रद्द झाल्याने ग्रामीण अर्थ व्यवस्थेवर प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे
शहरात जमावबंदी संचारबंदी शक्य आहे.गावात यातलं काहीच शक्य नाही अवघड वेळी आपण गाव जवळ करतो पण आपण ही साध्य भोळ्या लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून दक्षता आणि संयम बाळगने तितकेच महत्त्वाचे आहेआतां पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर अजून तरी धुरसच आहे मात्रा गावपातळीवर कोरोनाबद्दल समज गैरसमजाच्या पलीकडे अफवांना बक्कळ खतपाणी मिळत आहे. मरणाच्या विचाराने अध्यात्मिक होणाऱ्या लोकांना हे गांभीर्य समजावून सांगणे अवघड आहे एवढ्या उन्हात तो रोग आपल्या कडे नाय येतच नाय असा समज आहे. या मानसिकतेच आपण काय करणार आहोत.तरी आपण एकमेकांना धिर देत राहू अफवांच्या स्फोटात शक्य असेल तेव्हा योग्य माहिती देत राहू…
या कोरोनाच्या खेळाचे गणित मात्र अजून पुर्णपणे कोणालाच उलघडले नाही पण हा खेळ कधी थांबणार याची मात्र सर्वच आपण आतुरतेने वाट पाहतायेत हे मात्र नक्की…


