Share

पवारांसमोर गडकरी म्हणाले, साहेब आम्हाला ‘त्या’ गोष्टीची लाज वाटते

Published On: 

नगर – एकट्या पुणे जिल्ह्यात , कोल्हापूर जिल्ह्यात जे दूध संकलित होतं तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही याची आम्हाला लाज वाटते असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी यांनी आज नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

नितीन गडकरींनी दूध उत्पादनाबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, एकदा राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरिच्या मीटिंगला आले होते. त्यावेळी मी मदर डेअरचे चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, आमच्याकडे 3 लाख लिटर दूध कलेक्शन होतं, ते 10 लाख लिटर कसं होईल. त्यानंतर मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला, एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते, म्हणून आपल्याला ग्रामीण भागात, विशेषत: आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादानमुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना नागपूरमधील साखर कारखानदारीच्या अवस्थेवरून देखील नितीन गडकरींनी यावेळी मिश्किल टिपण्णी केली. ते म्हणाले, “काल मी आमच्या केंद्रातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आमच्याकडे टिश्यू कल्चरचा ऊस लागतो. कारखानदारी म्हणायचं तर कोल्हापूरची साखर कारखानदारी मेरीटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा वाटते, मराठवाडा म्हणजे फर्स्टक्लासमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आणि विदर्भ म्हणजे ज्यांना १०० पैकी २० पेक्षा कमी गुण मिळालेत त्यांची शाळा. पण आता आम्ही ५० नर्सरी तयार केल्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांना रोपं मिळायला लागली आहेत”, असं गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!