🕒 1 min read
बीड : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडे रस्त्याच्या कामावरून महाविकास आघाडी सरकारला पत्र लिहिले होते. त्यामुळे बराच वाद रंगला होता. पण, आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीच पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भेगा पडल्या असून याबद्दल गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले होते.
पैठण पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत…माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच त्यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही… तात्काळ दखल घेतली जाईल… pic.twitter.com/2Txjdc6hXa
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 19, 2021
पंकजा मुंडे यांनी रविवारी ट्वीट करून पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भल्या मोठ्या भेगचा फोटो शेअर केला. इतकेच नव्हे तर यासंदर्भात नितीन गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यानंतर पंकजा मुंडे यांचे गाऱ्हाणे केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ऐकले आहे. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना अडचण सोडवण्याचे आदेश दिले आहे. पंकजा यांच्या ट्विटला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, संबंधित महामार्गाचे कंत्राटीदाराविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत आणि रस्त्याची दुरुस्ती लवकर करण्याचे सांगितले आहे. यावर पंकजा मुंडे यांनी गडकरी यांचे आभार मानले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक विरोधक देखील करत असतात. त्यांनी देशभर केलेल्या रस्त्यांच्या कामाचं कौतुक तर नेहमीच होत असतं. गडकरी आपल्या गतिमान कार्यशैलीसाठी का प्रसिद्ध आहेत याची अनुभूती परत एकदा पाहायला मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
