Share

श्रेया घोषालच्या घरी गोंडस चिमुकल्याचं आगमन

Published On: 

मुंबई : प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला शनिवारी मुलगा झाला. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे. श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे कि, ‘ देवानं आज दुपारी आम्हांला मुलाच्या रुपाने त्याचा आशिर्वाद दिला आहे. आई होणे ही एक सुंदर आणि भावूक अशी भावना आहे. याआधी असा अनुभव कधीच आला नव्हता. मी, शिलादित्य आणि आमचे संपूर्ण कुटुंब हा क्षण साजरा करत आहेत. तुम्हा सर्वांनी दिलेल्या आशिर्वादाबद्दल मनापासून धन्यवाद…’

काही दिवसांपूर्वी श्रेयाने आपण आई होणार असल्याची बातमी दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयाने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. कोरोना काळात सध्या मनोरंजन विश्वातून अशाच खूप चांगल्या बातम्या येत आहेत. करीना देखील दुसऱ्यांदा आई झाली.

https://www.instagram.com/p/CPLCt-Ngx_M/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, श्रेया घोषालने तिचे काही डोहाळेजेवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी श्रेयाच्या मैत्रिणींनी तिला छानसं सरप्राईझ देखील दिलं होत. श्रेयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटव फोटो शेअर करत फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “लांब असूनही जेव्हा तुमच्या मैत्रिणींना तुमचे लाड पुरवायचे असतात. माझ्या ‘बावरी’जकडून ऑनलाईन सरप्राईझ डोहाळेजेवण…प्रत्येकीने स्वतःच्या हाताने काहीतरी करून पाठवलं. खूप मज्जा आली, खेळही खेळले. मी किती लकी आहे!’ लॉकडाऊनमुळे श्रेयाच्या सखींनी तिचे ऑनलाईन डोहाळ जेवण साजरी केली होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!