Share

अॅपमधील बिघाडामुळे फ्रंटलाइन वर्कर्स लस मिळण्याच्या प्रतिक्षेत!

Published On: 

औरंगाबाद : केंद्र सरकाने ४५ वर्षांवरील व्यक्तीसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केल्यानंतर फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचार्‍यांची नोंदणी बंद केली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून ही नोंदणी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात नोंदणी करणाऱ्या कोविन अॅपमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याने अजूनही फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरु झालेले नाही. एकीकडे प्रशासन फ्रंटलाइन वर्कर्सला लस घ्या असे सांगत असले तरीही दुसरीकडे लसीकरण केंद्रातील कर्मचारी अॅपमधील बिघाडाचे कारण पुढे करत नकार कळवत आहे.

शहरात १६ जानेवारी पासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून आजवर पहिल्या टप्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना लस देण्यात आली. दुसर्‍या टप्यात फ्रंटलाईन वर्कर आणि तिसर्‍या टप्यात ६० वर्षांवरील व ज्यांचे वय ४५ पेक्षा जास्त आहे, मात्र त्यांना गंभीर आजार आहेत अशा लाभार्थ्यांना लस देण्यास सुरूवात करण्यात आली. यानंतर लसीकरणाची गती वाढवण्याचे शासनाने आदेश दिले. त्यानुसार मनपा प्रशासनाने जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली.

सदर मोहीम सुरू असतांना फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण मागे पडले होते. सात एप्रिल पासून ते पुन्हा सुरू होत असल्याची घोषणा आरोग्य अधिकाऱ्यांनी केली. मात्र शहरातील अनेक केंद्रांवर याबाबत चौकशी केली असता नोंदणी करणाऱ्या कोविन अॅपच बंद असल्यामुळे कुठल्याही ठिकाणी फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण काल सुरू झालेले नाही. तसेच हे अॅप सुरु होण्यासाठी २ दिवस तरी लागतील. अशी माहिती विविध लसीकरण केंद्रांवरून देण्यात आली.

लसीकरणाच्या सुरुवातीला अशीच समस्या

१६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. मात्र लसीकरण सुरु झाल्याच्या दोनच दिवसात कोविन अॅपमध्ये बिघाड झाला होता. लसीकरणासाठी कोव्हिन अ‍ॅपमध्ये नोंदणी केल्यानंतरच लाभार्थ्यांना लसीकरण होणार असल्याने या अ‍ॅपची यात महत्वाची भूमिका होती. मात्र अ‍ॅपमध्ये वारंवार बिघाड झाल्याने लसीकरण मोहिमेवर याचा प्रभाव जाणवला. याबाबत मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!