जालना: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या दुकानांना निर्बंध लावल्याबद्दल सरकारच्या या आदेशाचा जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने निषेध केला. निर्बध सरकारने शुक्रवारपर्यंत मागे घेऊन व्यापार खुला केला नाही तर जिल्ह्यातील सर्व व्यापारी कायदेभंग करून परंतु कोरोना सुरक्षा नियमाचे पालन करून सोमवारपासून आपापली दुकाने उघडतील, असा इशारा प्रशासनास देण्यात आला.
महाराष्ट्र सरकारने लादलेल्या लॉकडाऊनसंदर्भात पुढील भूमिका ठरविण्यासाठी आज गुरूवारी रामभाऊ राऊत नागरी सहकारी पतसंस्थेच्या मिटींग हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सरकारच्या लॉकडाऊन संदर्भातील भूमिकेचा विरोध करून पुढील रणनितीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील विविध असोसिएशनचे तसेच तालुक्यातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सरकारच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत सर्व व्यापारी संघटनांच्या प्रमुखांनी वेळप्रसंगी सरकारच्या कायदेशीर कारवाईस सामोरे जाण्याची मानसिक तयारी दर्शवली आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून पालकमंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अंशत: लॉकडाऊनला सक्त विरोध असल्याची भूमिका मांडली आहे. तरीही सरकारने व्यापारी महासंघाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारावर निर्बंध घातले आहेत.
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- यम है हम! जालनावासियांना घरी बसवण्यासाठी यमराज आले रस्त्यावर
- भारतातील ‘ या ‘ शहरांमध्ये असतील टेस्ला कारचे शोरुम
- ‘बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा रीशेड्यूल केल्या पाहिजेत’
- सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने रोहित शर्माविषयी केला मोठा खुलासा

