औरंगाबाद : पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घोषणा केल्यानंतर सात महिन्यांनी अखेर महापालिकेने मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. आगामी पंधरा दिवसात २० के.एल.चे दोन टँक उभारून ज्यांना गरज आहे अशा रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
गतवर्षी कोरोना विषाणूमुळे झालेला उद्रेक पाहता, ऑक्सिजनचा निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे याची दखल घेत त्यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरसाठी स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे जाहीर केले. मात्र पुढे जिल्हा प्रशासनाने निधी देण्यात हात आखडता घेतला.
चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. तसेच निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे पत्रही जिल्हाधिकर्यांनी पालिकेला दिले. मात्र केवळ पत्राच्या आधारे काम सुरु करण्यास पालिकेने नकार दिला.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मागील महिन्यात पालिकेला साडेचार कोटी रुपयांचा निधी दिला. निधी मिळाल्यावर पालिकेने कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले. त्यावर कंत्राटदाराने ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचे काम आता सुरू केले आहे. याविषयी माहिती देताना डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, २० के.एल.चे दोन टँक उभारले जाणार आहेत. १५ दिवसात पायाभरणी करून टँक उभारला जाईल. या टॅकमधूनच चार कोविड सेंटरला ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा व्यापारी महासंघाचा सरकारला इशारा; निर्बंध हटवा, नसता दुकाने उघडू!
- राज्यात शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु काय बंद ?
- लसीकरणात औरंगाबादने केला दिड लाखांचा टप्पा पार!
- MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचं विनायक मेटे यांनी केले स्वागत
- परभणीत केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीचा रिपोर्ट केंद्र सरकारला पाठवणार


