Share

दलालांवर कारवाई झाली तर ताजा भाजीपाला योग्य दरात मुबलक उपलब्ध

Published On: 

तुळजापूर -शहरासह परिसरात मोकळ्या जागेत टमटम मोटार सायकलवरुन भाजीपालासह दही दुध फळे विक्री दोन ग्राहकांमध्ये अंतर ठेवुन विकला जात आहे. भाजीपाला लोकांना योग्य दरात मिळत असून लाँकडाऊन काळात नागरिकांना भाजीपाला मुबलक मिळत आहे .

लाँकडाऊन होताच भाजीपाला मिळणार आहे असे गृहीत धरुन लोकांनी भाजीमार्कट मध्ये ऐकच गर्दी केल्याने प्रशासन चिंतेत पडले होते माञ यावर मात करण्यासाठी शेतकरी वर्ग भाजीपाला विक्रेता सरसावले. याला प्रशासनाने वेळ न दवडता ग्राहकांमध्ये अंतर ठेवण्याच्या अटीवर विक्रीस परवानगी दिली. शेतकरी वर्गातील काहींना डोक्यावर सायकल,मोटार सायकल, टमटम मध्ये भाजी विकण्यासाठी आणुन ती गल्लोगल्लीत विकण्यास प्रारंभ केला आहे.

दरम्यान, यामुळे भाजीमंडई पेक्षा भाजीपाला कमी दरात व ताजा उपलब्ध झाल्याने नागरिकांना भाजीपाला मिळण्याच्या चिंते पासुन सुटका मिळाली. अशा संकट काळात या फिरत्या भाजी विक्रेतांनी माणुसकी जोपासत दरवाढ न करता भाजीपाला विकत असल्याने ही मंडळी शहरवासियांसाठी भाजीपाला मिळवुन देणारे दूत ठरले आहेत.

सध्या टमटम मधुन भाजी विकणा-या मंडळीसाठी हजार ते दीड हजार दिवसाचे भाडे द्यावे लागत आहे. यामुळे टमटम वाहन चालकांना रोजगार मिळाला असुन शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यास बाजार पेठ व ग्राहकांना योग्य भावात ताजी भाजी मिळत आहेत.ऐकमेकात समन्वय ठेवुन माणुसकी जोपासली तर त्याचा काय लाभ होतो हे शेतकरी भाजीपाला विक्रेत्यांनी दाखवून दिले आहे.

दलांलानवर कारवाई कारवाई ची मागणी

तुळजापूर आठवडा बाजार येथील नवीन इमारतीमध्ये भरत असलेल्या भाजी मार्केट मध्ये काही गुंड प्रवृत्तीचे भाजीपाला विक्रेते शेतकरी कमी दरात भाजीपाला विकत असल्याने त्यांचा कडून कमी दरात घेवुन जादा दराने विकत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अशा गुंड भाजीपाला विक्रेतांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!