Share

सोशल मिडियाचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे -प्रविण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  – ठाकरे सरकारच्या आश्रयाने सोशल मिडियामध्ये जो उच्छाद मांडला जात आहे व ज्या पद्धतीने मिडियाचीही मुस्कटदाबी केली जात आहे, ती  रोखण्यात यावी व सोशल मिडियाचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका भाजपाच्या शिष्टमंडळाच्यावतीने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे मांडण्यात आल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर व मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली खासदार गोपाल शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार पराग अळवणी, आमदार मनिषा चौधरी, आमदार भारती लव्हेकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार सुनिल राणे यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली मते व्यक्त करणा-या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येत आहे, तसेच समाजामधील जर कोणीही व्यक्ती सोशल मिडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असेल तर त्यांनाही पोलिस स्टेशनला बोलवून त्यांच्यावर गु्न्हा दाखल करणे असे प्रकार सध्या सुरु आहेत. हे प्रकार म्हणजे राज्याला अराजकतेकडे जाणारे चित्र ठाकरे सरकारच्या कारकिर्दीत निर्माण झाल्याचेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.

सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होणारे अभिव्यक्ति स्वातंत्र्य तसेच प्रसार माध्यमांची स्वातंत्र्यता याबाबत सरकारचा एकतर्फी जुलूमी कारभार सुरु आहे. त्यामुळे यासंदर्भात अंकुश आणण्यासाठी निवृत्त न्यायाधीश, मुख्य सचिव आणि सोशल मीडियामधील तज्ज्ञ सदस्यांची एक समिती नियुक्त करावी. या समितीचा अहवाल मागून राज्यपालांनी या विषयात स्वत: हस्तक्षेप करुन या गोष्टी थांबवाव्यात अशी आमची भूमिका आम्ही राज्यपाल महोदयांकडे मांडली असेही दरेकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!