हिंगोली : हिंगोली जिल्ह्यामधील कोविड सेंटर मध्ये नागरिकांचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे. कोरोना महामारी आपला कहर दाखवत असताना हिंगोली प्रशासन मात्र हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी समोरील पॅसेजमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.
गेटपासून ते दुसऱ्या मजल्यावरील खोलीपर्यंत जाताना त्यांना कोणीही हटकत नाही. वर जाण्यास सहसा कोणी विरोध करीत नाही. कोणी अधिकारी आला की, नावापुरता विरोधाचा प्रयत्न होतो. मात्र, सवय झालेले नातेवाईक त्यामुळे ऐकत नाहीत.औंढा रोडवरील अल्पसंख्याक वसतिगृहाच्या इमारतीत सुरक्षा रक्षकाकडून गेटवरच अडविले जाते. डबा द्यायचा झाला तर नातेवाइकांना फोन करून रुग्णास बोलवावे लागते. शिवाय पोलीसही असल्याने नातेवाईक घाबरतात. जर रक्षक एकटा असेल तर वाद घालून काहीजण जाण्याचा प्रयत्न करतात.
जर कोविड सेंटरमध्ये नातेवाईक थेट जात असतील, तर हा प्रकार गंभीर आहे. रुग्णांसाठी जेवणासह सर्व व्यवस्था केल्याने नातेवाइकांनी तेथे जाण्याचे कारण नाही. तसे यापुढे होणार नाही, यासाठी सक्त सूचना दिल्या जातील. हा प्रकार न रोखल्यास कारवाईही करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘ते’ १०० कोटी रुपये गेले कुठे ? याचा उल्लेखच नाही – शरद पवार
- अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; शरद पवारांचं भाष्य !
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

