औरंंगाबाद : हज यात्रेला पाठविण्याचा बहाणा करुन कुटंबाला तब्बल १३ लाख ५० हजारांचा गंडा घातल्या प्रकरणी अलबशीर टुर्स अ;ॅण्ड ट्रॅव्हल्सचा मालक अब्बास अली वाहीद अली हाश्मी (वय ३८, रा. चांदमारी, नंदनवन कॉलनी) याला क्रांतीचौक पोलिसांनी मंगळवारी (दि.१५) अटक केली.
सय्यद जमालोद्दीन गफ्फार सय्यद अब्दुल गफ्फार (वय ३१, रा. पंढरपुर एमआयडीसी वाळूज) हे २०१७ साली आई-वडील व भावासह हज यात्रेला जाणार होते. परंतु त्यांचा हज यात्रा कमिटीच्या वतीने नंबर लागला नव्हता. त्यावेळी सय्यद जमालोद्दीन गफफार यांना अब्दुल हाजी याने पैठण गेट येथील अलबशीर टुर्स या ट्रॅव्हॅल्सचा मालक अब्बास अली हा हज यात्रेला घेवून जातो असे सांगितले. त्यावेळी सय्यद जमालोद्दीन गफफार यांनी अब्बास अली याची भेट घेवून हज यात्रेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे प्रत्येकी २ लाख ७० हजार रूपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांनी अब्बास अली याच्या बँक खात्यात ५ लाख १० हजार रूपये जमा केले होते, तर ३ लाख रूपये त्याच्या ऑफीसमध्ये नेऊन जमा केले होते. तसेच सय्यद जमालोद्दीन गफफार यांच्या ओळखीचे जफर पठाण यांनी देखील हज यात्रेसाठी अब्बास अली यांना ५ लाख ४० हजार रूपये दिले होते, तसेच इतरांनी देखील पैसे जमा केले होते.
दरम्यान, अब्बास अली याने सय्यद जमालोद्दीन गफफार यांच्यासह सर्वांना २४ ऑगस्ट २०१७ रोजी मुंबईला विमानतळावर या तेथेच व्हिसा देतो असे सांगितले. सर्व जण मुंबईला गेल्यावर अब्बास अली याने दुसऱ्या दिवशी तिकीट कन्फर्म होईल असे सांगितल्यामुळे सर्वजण मुंबईलाच थांबले होते. दुसऱ्या दिवशी सय्यद जमालोद्दीन गफफार यांनी अब्बास अली यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

