Share

धाकधूक वाढली : सोलापूर जिल्ह्यात चौदा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; २१४ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत

Published On: 

सोलापूर : जिल्ह्यांत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सायंकाळच्या माहितीनुसार वाढ नाही. आतापर्यंत १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातील एकाचा अधिक मृत्यू झाला आहे. तर १३ जणांवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तर २१४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी सायंकाळी दिली.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी आणखीन एका कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या चौदावर पोहचली आहे. सदर व्यक्ती हा पाच्छापेठ परिसरात आहे. तर इतर १२ जण पाच्छा पेठ परिसरसतील आहेत. त्यांच्यावर सिव्हिलहॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापुरातील आयसोलेशन वॉर्डमध्ये ७१८ जणांचे स्वब घेण्यात आले. त्यापैकी 504 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 490 व्यक्ती निगेटिव्ह असून १४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले असून या १४ लोकांच्या संपर्कात अालेल्या ३१४ व्यक्तींना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!