🕒 1 min read
अहमदनगर:- राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, ४ तारिखला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली असून सर्व उमेदवारांची मुख्य लढत आता स्पष्ट झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंकेंनी केली आहे.
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून पारनेर तालुक्यातील १० व नगर तालुक्यातील १ अशा एकूण ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. तर ४ गावांतील एका जागेमुळे त्या गावची निवडणुक लागली आहे. विशेष म्हणजे आमदार लंके यांच्या प्रयत्नातून जवळपास २१० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आ.लंके यांचे स्वत:चे गाव असणारे हंगा ग्रामपंचायत पहिल्यांदाच बिनविरोध झाले आहे.
दरम्यान, चार गावांत फक्त एका जागेसाठी निवडणूक होत असल्याने त्या गावांची 25 लाखाच्या विकास निधीची लॉटरी हुकली आहे. तालुक्यातील जातेगाव, पाबळ, पठारवाडी व वडगावदर्या या गावातील ग्रामपंचायत निवडणूक केवळ एका जागेसाठी होणार आहे. तर डिकसळ येथे दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. या गावांतील इतर सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता त्याचा परिणाम या गावांना 25 लाख रूपयांचा निधी मिळणार नसल्याने त्यांची 25 लाखाची लॉटरी हुकली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस भरतीचा जीआर : SEBC आरक्षण वगळून होणार भरती; मराठा समाजाला मोठा धक्का !
- नवख्या नवदीप सैनीसह हिटमॅन रोहित शर्माच्या खेळण्यावर अखेर शिक्कामोर्तब, तर ‘या’ खेळाडूंना डच्चू
- अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
- तेलाच्या जाहिरातीतून सौरव गांगुलीला काढल्यानंतर अडानी ग्रुपच स्पष्टीकरण
- सेक्रेड गेम्स’ च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, नवाझुद्दीनचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
