Share

नवख्या नवदीप सैनीसह हिटमॅन रोहित शर्माच्या खेळण्यावर अखेर शिक्कामोर्तब, तर ‘या’ खेळाडूंना डच्चू

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. उद्या म्हणजेच सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.

उद्यापासून सुरू होणाऱ्या या क्रिकेट सामन्याला जास्त महत्व असणार आहे. कारण, जो संघ हा सामना जिंकेल तो मालिका जिंकण्याच्या अधिक जवळ जाणार आहे. अशातच, मधल्या काळात हिटमॅन रोहित शर्मा याच्या खेळण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर तो पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियायात दाखल झाला. त्याने कोरोनाच्या विलगीकरणाचे सर्व नियम काटेकोरपणे पार केले होते. दरम्यान, एका चाहत्याच्या विवादित पोस्ट व भेटीमुळे रोहित, रिषभ पंत, पृथ्वी शॉ व अन्य दोन खेळाडूंनी नियम मोडल्याचे समोर आल्याने त्यांच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती.

गळाभेट दिल्याची पोस्ट ही उत्साहाच्याभरात या चाहत्याने केल्याचं स्पष्ट केलं होतं. पंतने गळाभेट घेतली नसल्याचे समोर आलं. तसेच , या खेळाडूंची कोरोना चाचणी देखील निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना खेळण्यास परवानगी मिळाली आहे. तर, बीसीसीआय व सीए याबाबत अधिक चौकशी करत आहे. दरम्यान, रोहित शर्माकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले असून तो मयांक अग्रवालच्या जागी खेळणार आहे.

तर, नवदीप सैनी या सामन्याद्वारे कसोटी क्रीडा प्रकारात पदार्पण करणार आहे. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज उमेश यादवऐवजी सैनीला खेळवण्यात येणार आहे. उमेश यादवने डाव्या पोटरीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली होती.

भारताचा प्लेइंग इलेव्हन संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!