परभणी : महाराष्ट्र शासनाच्या, ग्राम विकास विभागाचे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) अंतर्गत राज्यातील 100 आदर्श शाळांच्या निवडीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा अभियान परिषदेद्वारे जिल्ह्यातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना भेटी देऊन आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी दिले.
पालम तालुक्यातील तीन शाळांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुयनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाव्हा व गंगाखेड तालुक्यातील डोंगरजवळा जिल्हा परिषद शाळेचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळांचा भौतिक कायापालट, शाळा समितिचे बळकटीकरण व शाळामध्ये आनंददायी शिक्षण होण्यासाठी हा कार्यक्रम खूप सुंदरपणे राबविण्यात यावा. पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण होण्यासाठी एक मूल एक झाड ही संकल्पना राबवावी व या कार्यक्रमाला सांगड म्हणून मानव विकास मिशनअंतर्गत संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलचे वाटप करण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित शाळांना संरक्षण भिंती, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी परसबाग निर्माण करणे,शौचालयाची दुरुस्ती व शाळेच्या विद्यार्थ्यांना पीन्याच्या पाण्यासाठी आरओ, कंपोस्ट पिट याबाबत निर्देश दिले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचात) ओमप्रकाश यादव व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांना तालुक्यातील निवड झालेल्या शाळांना भेटी देऊन निकष पूर्ण केल्याची तपासणी करावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी बैठकीत दिले. निकष पूर्ण करणार्या शाळांना 3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीला आदर्श शाळा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी ओमप्रकाश यादव, शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर, गट शिक्षणाधिकारी पालम ढवळे, गंगाखेड विस्तार अधिकारी भालेराव, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक योगेश जाधव, तालुका समन्वयक अमरदीप वाकळे, शिवराज शिंदे, हनुमंत हिंगारूपे आदींची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट, बातमीनंतर जलवाहिनीच्या कामाची रक्कम भरली
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
- ‘एखाद्या पराक्रमी योद्ध्याप्रमाणे मुंडेंचं स्वागत होतंय, त्यांचं स्वागत करणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी’

