Share

दुचाकीस्वारांच्या हेल्मेटसाठी बीआयएस मानकांमध्ये सुधारणा करणारी समिती स्थापन होणार…

Published On: 

नवी दिल्ली : देशातील वाढत्या रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये अनेकदा भर पडते ती दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरणे किंवा योग्य दर्जाचे हेल्मेट नसल्याने वाहनचालकाचा बचाव होणे कठीण होत असते. यासाठी  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एसओ. 4252 (ई) अन्वये 26 नोव्हेंबर 2020 रोजी ‘दुचाकी मोटार वाहनस्वारांसाठी हेल्मेट आदेश 2020’ जारी केला आहे.

अनिवार्य बीआयएस प्रमाणपत्र आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशाअंतर्गत दुचाकी स्वारासाठी संरक्षक हेल्मेटचा समावेश करण्यात आला आहे. देशातील हवामानाच्या अनुषंगाने भारतामध्ये वजनाने हलके हेल्मेट वापरण्या संदर्भात विचार करण्यासाठी आणि हेल्मेट घालण्यासंदर्भात नागरिकांमध्ये अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी रस्ता सुरक्षाविषयक सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या निर्देशानुसार एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये एम्समधील तज्ञ डॉक्टरांसह आणि बीआयएस तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश आहे. मार्च 2018 मध्ये समितीने आपल्या अहवालातील सखोल विश्लेषणानंतर देशामध्ये वजनाने हलके असलेले हेल्मेट वापरण्याची शिफारस केली आणि मंत्रालयाने तो अहवाल स्वीकारला. समितीच्या शिफारशींनुसार, बीआयएसने काही वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा केली असून यामुळे वजनाने हलकी हेल्मेट तयार करणे अपेक्षित आहे. भारतीय बाजारपेठेत असलेली चांगली स्पर्धा आणि असंख्य हेल्मेट उत्पादक कंपन्यांमुळे आता चांगल्या प्रतीची आणि वजनाने हलक्या असणाऱ्या हेल्मेट्सचे उत्पादन करण्यास सहाय्य मिळेल अशी अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!