🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : देशाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संसदेतील खासदारांची संख्याही वाढवली पाहिजे, असा सल्ला देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला आहे. इंडिया फाऊंडेशनद्वारे आयोजित अटल बिहारी वाजपेयी स्मृती व्याख्यान कार्यक्रमात बोलताना त्यांनी खासदारांच्या संख्यावाढीबाबत भाष्य केले.
ते म्हणाले की, लोकसभेची सदस्य संख्या 543हून वाढवून एक हजार करायला पाहिजे. तसेच राज्यसभेची सदस्य संख्यासुद्धा वाढवण्याची गरज आहे. देशाची लोकसंख्या आणि वाढत्या आकारामुळे सदस्य संख्या वाढवणं आवश्यक आहे. 1977ला लोकसभेची सदस्य संख्या शेवटची बदलण्यात आली होती. 1971च्या जनगणनेच्या आधारावर ती सदस्य संख्या ठरवण्यात आली होती. त्यावेळी देशाची लोकसंख्या 55 कोटी होती. तेव्हापासून आतापर्यंत देशाची लोकसंख्या दुपटीनं वाढली आहे. त्यामुळेच लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा पुन्हा विचार करायला हवा, असे प्रणव मुखर्जी म्हणाले.
दरम्यान माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बहुमताच्या दुरुपयोगावरून इशारा दिला आहे. आपल्याला वाटतं सदनात पूर्ण बहुमत मिळालं आहे, म्हणजे आपण काहीही करू शकतो. परंतु असं करणं योग्य नाही. अशा लोकांना जनतेनंच वेळोवेळी धडा शिकवला आहे. संसदीय लोकशाहीत बहुमत स्थिर सरकार बनवण्यासाठी मिळतं, असेही प्रणव मुखर्जी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206797597161082882?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206795920194428928?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206785017680031744?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
