Share

Aurangabad Violence : शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांना अटक

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांना पोलिसांनी अटक केलीय. क्रांतीचौक पोलिस ठाण्यात केलेल्या तोडफोड प्रकरणी जैस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. प्रदीप जैस्वाल यांच्यावर तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

शहरात ११ व १२ मेला झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गांधीनगर येथील दोन आरोपी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये अटक होती. या आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी करत शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल रविवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान क्रांती चौक पोलीस स्थानकात आले. तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना सोडण्यास असमर्थता दर्शवली.

दरम्यान,जैस्वाल यांनी पोलीस स्थानकात गोंधळ घालत तेथील साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी त्यांच्या विरोधात ३५३, ३३२, ५०४ ,५०६, ४२७ कलमासह शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, प्रदीप जयस्वाल यांनी मात्र हे सगळे आरोप फोटाळले आहेत. आपण टेबलावरील पेन पॅड ठेवला आणि काचेला तडा गेल्याचं म्हटलं आहे. शिवाय खुर्च्यांच्या फेकाफेक केली नसल्याचं म्हटल आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!