🕒 1 min read
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रासह जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. राज्यभरात विविध उपक्रमांसह मर्दानी खेळ, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात ही शिवजयंती साजरी केली जाते. फक्त देशात वा राज्यातच नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती जगभरात उत्साहात साजरी केली जाते.
मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच आयोजनाची तयारी झाली आहे. मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत अस्ल्यामुले गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.
राज्य सरकारने नवी नयमावली जाहीर केली असून शिवजयंतीला आता १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. याबाबत राज्य शासनाच्या गृहविभागाने नवीन परिपत्रक जारी केलं आहे. १०० लोकांच्या उपस्थितीला परवानगगी देण्यात आली असली तरी इतर निर्बंध मात्र राज्य सरकारने कायम ठेवले आहेत.
राज्य सरकारने लादलेल्या या निर्बंधावर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सडकून टीका करत आपण १९ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारच असल्याचा निर्धार केला आहे. ‘सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी दरवर्षी प्रमाणे महाराजांच्या मंदिरात अभिषेक करणार आहे. मोठ्या संख्येने माझ्या सोबत शिवभक्त असतील. असेल हिंमत तर ठाकरे सरकारने मला थांबवून दाखवावं’. असा इशारा निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी दरवर्षी प्रमाणे महाराजांच्या मंदिरात अभिषेक करणार आहे. मोठ्या संख्येने माझ्या सोबत शिवभक्त असतील… असेल हिंमत तर ठाकरे सरकारने मला थांबवून दाखवावं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 15, 2021
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये काका-पुतण्यांच्या राजकारणामुळे जनता वेठीस-विनायक मेटे
- कोरोनाचा धोका वाढतोय, पुण्यात गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या 2012 रुग्णांची नोंद
- हिरकणीनंतर आता सोनाली कुलकर्णी झळकणार आणखी एका शौर्यगाथेत
- ‘सतत टीका करणे योग्य नाही’, चेन्नईच्या पिचला नावं ठेवणाऱ्यांना गावसकरांचं चोख उत्तर
- कोणी काहीही बोलू द्या, मी संयमाने जनतेची कामे करतो-आ.संदिप क्षीरसागर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

