🕒 1 min read
औरंगबाद : जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जाधव यांना मारहाण करून त्यांच्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. न्यायालायच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, ३७ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली होती.त्यानुसार अमन चढ्ढा, करण चढ्ढा, ममता चढ्ढा, अजय चढ्ढा, मनीष आनंद (रा. खडकी बाजार) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंध येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेसमोर १४ डिसेंबरला सायंकाळी सात ते रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. चढ्ढा यांनी केलेल्या तक्रारीत जाधव यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी पुढील चौकात आणखी एका वाहनचालकाला धडक दिल्याने त्यांना जमावाने अडवून मारहाण केली होती. याप्रकरणी जाधव यांना अटक करण्यात आली होती. आपल्यालाही मारहाण झाल्याचे जाधव यांनी सांगूनही त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
तक्रारीत म्हटले आहे की, औंध परिसरात त्यांनी कार उभी केली होती. कारचा दरवाजा उघडला असता, पाठीमागून अजय चढ्ढा आणि ममता चढ्ढा यांनी धडक दिली. त्यानंतर मोठ्याने ओरडून तक्रारदारांना शिवीगाळ केली. अजय चढ्ढा यांनी जाधव यांच्या मैत्रिणीचा विनयभंग करून थोबाडीत मारली. त्यानंतर तक्रारदार आणि जाधव औंध चौकात गेले असता त्यांची गाडी अडवून चावी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर अमन चढ्ढा, करण चढ्ढा आणि मनीष आनंद यांनी विनयभंग करून तक्रारदारांना मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
महत्वाच्या बातम्या
- पॉपस्टार रीहानाच्या शेतकरी आंदोलनावरील ट्विटला माजी क्रिकेटपटूचे प्रतिउत्तर !
- काकांनी आता निवृत्त व्हावे; पुतणे आशिष यांचा अनिल देशमुखांना घरचा आहेर
- ‘एल्गार परिषदेच्या आडून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव’
- अत्याचार पीडितेची ओळख सांगू नका, औरंगाबाद खंडपीठाचे माध्यमांना निर्देश
- आरक्षण भूसंपादनाबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण- भालचंद्र शिरसाट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
