नवी दिल्ली : अद्याप देशावरच कोरोना संकट टळल नाही तोच आता काही राज्यांमध्ये आणखी एका साथीने धडक मारली आहे. या पार्श्वभूमीवर या राज्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. हे संकट आहे ‘बर्ड फ्लू’चं.
यामध्ये हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळ या राज्यांवर हे नवीन संकट ओढावलं तर सुदैवाने महाराष्ट्रात अद्यापही या साथीचा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली असून बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारी राजस्थानातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी 170हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर काही स्थलांतरित पक्षांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळल्यामुळे हे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिमाचल प्रदेश मधील कांडगा जिल्ह्यातील पोंग बांध तलावात हे पक्षी आढळून आले आहे.
पशुपालन विभागाच्या माहितीनुसार 425हून जास्त कावळे, बगळे आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. झालावाडमधील पक्ष्यांचे काही नमुने परीक्षणासाठी भोपाळमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा पशुरोग संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, इतर जिल्ह्यातील नमुन्यांचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
- विदर्भावर अजिबात अन्याय होऊ देणार नाही-अजित पवार
- मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच उद्योजकता विकसित करण्यासाठी शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
- नागपुरात विधिमंडळाचा कायमस्वरुपी कक्ष सुरू होणे हा ऐतिहासिक क्षण – नाना पटोले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले विश्वसनीय विश्वलिडर – रामदास आठवले


