मुंबई : 500 sqft व त्यापेक्षा लहान घरात निवास करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरावर मालमत्ता करात सूट देण्याबाबत ठराव करूनही त्याची अंमलबजावणीबाबत चालढकल करणाऱ्या प्रशासनाचा व सत्ताधाऱ्यांचा निषेध करून भाजपा नगरसेवकांचा विधी समितीत सभात्याग केला.
काल सोमवार दि 4 जानेवारी रोजी झालेल्या विधी समिती बैठकीत चर्चा करताना भाजपा नगरसेवकांनी सर्व सामान्य मुंबईकरकरिता महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या अशा निवासी 500 sqft व त्यापेक्षा लहान घरांच्या मालमत्ता करावरील माफी बाबत प्रशासनाला जाब विचारला .
त्या विषयावर अभिजित सामंत, अतुल शाह, अनिश मकवानी ह्यांनी प्रशासनाने ही माफी त्वरित लागू करावी अशी मागणी केली.अभिजित सामंत ह्यांनी आयुक्तांनी ह्या विषयावर निवेदन करावे अशी मागणी केली.आयुक्तांचे प्रतिनिधी सहआयुक्त वागराळकर ह्यांनी ह्या विषयावर भाष्य करण्या बाबत असमर्थता दाखवल्या नंतर भाजपा नगरसेवकांनी ह्या असंवेदनशीलतेचा निषेध केला व सभात्याग केला.
महत्वाच्या बातम्या
- विदर्भावर अजिबात अन्याय होऊ देणार नाही-अजित पवार
- कोरोनानंतर आता ‘या’ राज्यांवर ‘बर्ड फ्लू’चं संकट !
- राज्य सरकारने ‘हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे’ हे कृतीतून दाखवावे : चित्रा वाघ
- नागपुरात विधिमंडळाचा कायमस्वरुपी कक्ष सुरू होणे हा ऐतिहासिक क्षण – नाना पटोले
- राज्यातील जनता भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाला कदापी माफ करणार नाही : सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

