🕒 1 min read
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाईचा धडका लावला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज देताना आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर ईडीच्या मुंबई शाखेने त्यांना अटक केली. ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या पतीविरोधात प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग (PMLA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडीओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3250 कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण 40 हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हिडीओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वात 20 बँकांकडून घेतलं होतं. 2010 मध्ये 64 कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाईकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या:-
पुणेकरांनो मास्क वापराच! गेल्या तीन दिवसात तब्बल ‘इतका’ दंड वसूल
उद्धव साहेब आतातरी घराबाहेर पडा, नगरसेवक गाड्या फोडतात आता नागरिक देखील फोडतील…
विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी म्हणून भाजपची उच्च न्यायालयात धाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
