Share

विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी म्हणून भाजपची उच्च न्यायालयात धाव

Published On: 

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज होणार असून ही निवडणूक होऊ नये यासाठी भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ही माहिती दिली आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार घोषित केला असून त्याचा अर्जही दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून भाई गिरकर तर महाविकास आघाडी कडून आमदार निलमताई गोर्हे यांनीही अर्ज दाखल केला आहे.

आमदार कपिल पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती, भाजप त्यांना पाठिंबा देणार होतं पण आता भाजपने आपला स्वतंत्र उमेदवार दिल्याने एक वेगळी लढत बघायला मिळणार आहे. दरम्यान, काल विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस हा वादळी ठरला आहे. ग्राम पंचायतीमध्ये प्रशासक नेमणूक करण्यात आली होती. त्याबद्दल सुधारणा विधेयक मांडण्यात आले. परंतु, भाजपने या विधेयकावर जोरदार आक्षेप घेतला.

ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना पुन्हा हे विधेयक का? जो वाद न्यायालयात आहे त्यावर अध्यादेश काढायची घाई का? असा सवाल उपस्थितीत केला होता.

तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांचा दावा खोडून काढला. तुमची माहिती अपूर्ण आहे. 5 वर्ष सरपंच कसा यावा, याबाबत नियम आहे. पण 5 वर्षांनंतर काय करावं याबाबत कायदा नाही, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितले. परंतु, विरोधकांनी जोरदार गोंधळ करत सभात्याग केले.

महत्वाच्या बातम्या:-

शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी ! अवघ्या चार एकरात फक्त ४१ दिवसात तब्बल साडेबारा लाखांचं उत्पन्न

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर, वाचा कोणाकोणाचा समा

मोठी बातमी : नाशिक तसेच पश्चिम महाराष्ट्रला भूकंपाचा हादरा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!