🕒 1 min read
पुणे: पत्रकार पांडुरंग रायकरांचं कोरोनामुळे निधनानंतर पुण्यातील रुग्णालयांचा गलथानपणा उघडकीस आला आहे. रुग्णांना साधी रुग्णवाहीका ही मिळू नये खरंतर हे दुर्दैवंच म्हणावं लागेल. या प्रकरणासाठी जितके महापालिका आणि प्रशासन जबाबदार आहे तितकंच सत्ताधारीही जबाबदारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही घराबाहेर निघायला तयार नाही. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांचे लक्ष पुण्यावर नाही, सगळा अनागोंदी कारभार सुरू असल्याची चर्चा आहे.
काल मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून त्यांनी महापालिका अधिकार्याची गाडी फोडली. रायकरांच्या घटनेने प्रशासन काही शिकले नसेल तर अशा गोष्टी घडणारच आहेत. त्याचा संताप नगरसेवक वसंत मोरेंनी केला. ज्या पद्धतीने गलथान कारभार सुरू आहे ते बघता जनताही आपला आक्रोश अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरून व्यक्त करेल कारण आता त्यांना वसंत मोरे यांनी जे केलय त्यातून बळ मिळेल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकासआघाडी सरकार ज्या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती हाताळत आहे त्यात सुशासन व पारदर्शकता कुठे आहे? मोठा गाजावाजा करून कोरोनाची रुग्णालये बांधली, कशासाठी? लोकांना कोरोनाच्या भरवशावर सोडण्यासाठी? रुग्णालयांसाठी करोडो रुपये कशासाठी खर्च केलेत? सरकारी कर्मचारी रुग्णांना आणि नागरिकांना वेठीस धरत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरक्षित घरात बसून व्हिडीओ कॉंन्फरन्स करत आहेत. हा कसला कारभार? मुख्यमंत्री नेहमी म्हणतात, महाराष्ट्राची जनता ही माझी जनता आहे मग या जनतेबरोबर पाकिस्तानचे नागरिक असल्यासारखे व्यवहार का करण्यात येत आहे?
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकांचे रोजगार गेले आहेत. लघु उद्योग उध्वस्त झाल्याने लोक बरबाद झाली आहेत. आज लोकांना पोटाच्या गरजेबरोबर रोजगाराची गरज आहे आणि अशा वेळेस सरकार अस्मिता, मराठी माणूस, मुंबई, कंगणा रणौत या मुद्द्यांवर आपला वेळ वाया घालवत आहेत. ज्या पद्धतीने नगरसेवक वसंत मोरे यांनी आपला संताप व्यक्त केला त्याच संतापातून जनता रस्त्यावर उतरली तर आपली पळता भूई थोडी होईल.
महत्वाच्या बातम्या:-
पुणेकरांनो मास्क वापराच! गेल्या तीन दिवसात तब्बल ‘इतका’ दंड वसूल
शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी ! अवघ्या चार एकरात फक्त ४१ दिवसात तब्बल साडेबारा लाखांचं उत्पन्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
