नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर रवी शास्त्री पुढे काय करणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यावर आता रवी शास्त्री यांनी स्वतः उत्तर दिले आहे. स्टार स्पोर्ट्स इंडियाने रवी शास्त्री यांचा एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये शास्त्री किचनमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर ते काय करणार याविषयी चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नुकताच UAE मध्ये झालेला T20 विश्वचषक ही त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा होती, त्यानंतर राहुल द्रविडला टीम इंडियाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले.
‘स्टार स्पोर्ट्स इंडिया’ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शास्त्री स्वत: बनवलेल्या डिशचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की “काहीतरी शिजत आहे….रवी शास्त्री इथे का आले आहेत ते सांगा,” याशिवाय प्रोमोच्या शेवटी असे लिहिले आहे की, बघा कोण आलाय नव्या अवतारात.
Something's cooking… ????
Guess what @RaviShastriOfc is up to ????, and stay tuned to find out! pic.twitter.com/W7cZOHGMhn
— Star Sports (@StarSportsIndia) December 20, 2021
साहजिकच, नुकत्याच संपलेल्या T20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता आणि ते आता आपल्या जुन्या अवतारात परत येण्यासाठी उत्सुक आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत प्रत्येकी तीन सामने खेळवले जातील. रवी शास्त्रीचे कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन ही क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. दिग्गज प्रशिक्षक होण्यापूर्वी रवी शास्त्री समालोचनासाठी जगभरात प्रसिद्ध होते. दरम्यान, आत्ता शेअर केलेल्या व्हिडीओवरून रवी शास्त्री पुन्हा कॉमेंट्री करताना दिसणार असल्याचे समजत आहे.
महत्वाच्या बातम्या
- …पण कोरोनाची दहशत संपणार कधी?
- छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते; महादेव जानकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
- ६८ वर्षीय महिलेची गजब याचिका; ‘लाल किल्ला माझ्या नावावर करा’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश
- ‘निवडणूक कायदा दुरुस्ती’ विधेयक लोकसभेत मंजूर


