Share

श्रीगोंदा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आसाराम खेंडके यांचे नगरसेवक पद रद्द!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे- २०१९ मध्ये झालेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजी मंडई प्रभाग क्रमांक ६ मधून ७६ मतांनी निवडून आलेले श्रीगोंदा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आसाराम उर्फ अशोक गुलाब खेंडके यांचे नगरसेवक पद नगरपालिका अधिनियम १९६५ कलम ४४(१) (ई) नुसार अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांनी रद्द ठरविले आहे.

नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपने अशोक खेंडके यांना एक वर्षे उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली होती. मात्र वर्षभरानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

उपनगराध्यक्ष झाल्यानंतर अशोक खेंडके यांनी श्रीगोंदा नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक २१८८(३)(अ) मध्ये नगरपालिकेची परवानगी न घेता, तसेच ती जागा बिगर शेती न करता तेथेच शेड उभारून ट्रॅक्टर वर टेलरचे वर्कशॉप सुरू केले होते. त्यासाठी वीज देखील अनधिकृतपणे घेतली होती.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याच्या कडेला हे क्षेत्र असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियमांचेही उल्लंघन त्यांनी केले होते. म्हणून खेंडके यांच्या विरोधात पराभूत झालेले अख्तर शेख यांनी जून २०२० मध्ये आसाराम खेंडके यांच्या विरोधात नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे नगरपालिका अधिनियम ४४(१)(ई) प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्र ठरवून नंतर शासनाने कलम ४२(४) प्रमाणे पाच वर्षे अपात्र करण्याची मागणी केली होती.

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कलम ४४(१)(ई) प्रमाणे कार्यवाहीसाठी हे प्रकरण अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले होते. त्यावर दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी झाली.

जिल्हाधिकारी यांनी दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी खेंडके यांना अपात्र ठरविण्याचा आदेश काढला व त्याची एक प्रत नगरविकास खात्याला पाठवली आहे. त्यावरून नगरविकास खाते कलम ४२(४) ची कारवाई करून पुढील पाच वर्षे खेंडके यांना अपात्र ठरवू शकतात. खेंडके यांच्या अपात्रतेच्या निमित्ताने भाजपच्या नगरसेवकांची गळती मात्र सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!