मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बबीताजी सोशल मीडियावर सध्या प्रचंड अॅक्टिव्ह आहे. नुकताच तिने एक सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे चाहते तिच्यावर फार संतापले आहेत. इतके की, सोशल मीडियावर मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी केली जात आहे. ट्विटरवर ‘#ArrestMunmunDutta’ हा हॅशटॅगही व्हायरल झाला.
मुनमुनने या व्हिडीओत एका जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. ‘मी युट्यूबवर येणार आहे आणि मला चांगले दिसायचे आहे. मला कुण्या ***** सारखे दिसायचे नाही,’ असे मुनमुन या व्हिडीओत म्हणताना दिसली़. तिचा हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यानंतर हे प्रकरण इतकं तापलं कि, अभिनेत्री मुनमून दत्ता यांनी जातीवादी शब्दांचा वापर करून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामुळे भारतातील तमाम दलितांचा अपमान केला आहे असं बोलणं भारतातील आंबेडकरवादी जनता सहन करणार नाही त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्या,आता ईडीनेही दाखल केला गुन्हा
- ‘सोलापूरचे पाणी पळवणारे भरणे हे चोर आहेत आणि अजित पवार हे दरोडेखोर आहेत’
- ‘भाजपची भाषा रामराज्याची होती परंतु आता उत्तरप्रदेश-बिहार रामभरोसे सोडले’
- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी
- ‘आंदोलन दडपण्यासाठीच भरणे यांनी इंदापूरचे शेतकरी व शिवसैनिकांना बोलावले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

