🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. येत्या २१ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सभागृहाच्या कामाचा अनुभव नाही. त्यामुळे आज विरोधक या सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. रविवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरु होत आहे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही यात सहभागी होणार आहोत. पण विषय कोणापुढे मांडायचे, आमच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार याबाबत प्रश्न पडला आहे. असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना द्वेनेद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या खातेवाटपाबाबत भाष्य केलं. आणि आरोप देखील केला. फडणवीस म्हणाले की, ‘शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे सरकारची कामं थांबली आहेत,’ असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 हजार प्रति हेक्टरी मदत देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही मदत द्यावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत विरोधकांची भूमिका स्पष्ट केली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206191026257317888?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206185456993357824?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
