मुंबई : शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचं निधन झालं. उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुनील सुर्वे हे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. सुनील सुर्वे यांनी 25 दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली होती.
सुनील सुर्वे यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. जवळपास 23 दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनावर मात करून ते घरी आले होते.
पीक विमा भरण्यास मुदत वाढ द्यावी, शेतकऱ्यांची मागणी
सुनील सुर्वे यांना 15 दिवसांपूर्वी पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, म्हणून त्यांच्यावर घरीच उपचार करून ऑक्सिजन लावण्यात आले. मात्र दोन दिवसांपूर्वी त्रास वाढल्यानंतर सुर्वे यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुर्वे यांची बायपास झाली होती, शिवाय त्यांचे डायलिसिसही करावे लागत होते.
सुनील सुर्वे हे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक होते. 1995 पासून ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. अभ्यासू असलेले सुर्वे हे महापालिका सभागृह दणाणून सोडत असत. त्यांच्या निधनाने संघटनेत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
