मुंबई : २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील दोन खेळाडूंना एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले. मात्र हे प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. आता या प्रकरणातील दोषी कॅमेरून बॅनक्रॉफ्टने गोलंदाजांना या घटनेची माहिती असल्याचा मोठा खुलासा केला होता.
यानंतर त्या सामन्यातील गोलंदाजानी काही दिवसापुर्वी पुढे येत स्वत:ची बाजू मांडत त्या प्रकरणाविषयी माहित नसल्याचे स्परष्टीकरण दिले. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने एक वक्तव्य केले आहे. क्लार्क म्हणाला की मी गोलंदाजाच्या मताशी सहमत नाही. क्लार्कचे म्हणणे आहे की, गोलंदाजांनी या प्रकरणात दिलेली प्रतिक्रिया ही फार हुशारीने समोर आणली गेली आहे. या प्रकरणात मी प्रत्येक शब्दाबद्दल बोलणे टाळणार आहे. मात्र गोलंदाजाशी माझा काही वैयक्तिक वाद नाही. ते माझे मित्र आहेत. असे क्लार्क म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८ साली झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान बॉल टेम्परिंगच्या प्रकरणात कॅमेरून बॅनक्रॉफ्टने बॉल टेम्परिंगची माहिती ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आधीच होती, असे सांगितले. या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घातली होती, तर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर १२ महिन्यांसाठी बंदी घातली होती.
महत्वाच्या बातम्या
- गेवराईत नियमांचे उल्लंघन करणारे चार दुकाने सील
- सावधान! रक्त तपासणीच्या नावाखाली कोरोना रुग्णांची लूट सुरू
- रात्रीस खेळ चाले! परतूरमध्ये रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा
- अखेर आन्वा प्रशासनाला आली जाग; पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू
- शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध केल्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

