करमाळा : करमाळा तालुक्यातील राजकारण हे नेहमीच सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेले असते.आता पुन्हा एकदा करमाळा तालुका राजकीय कारणांसाठी चर्चेत येण्याची चिन्हे आहेत.मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तेव्हाचे आमदार नारायण पाटील यांचे तिकीट कापून राष्ट्रवादीतून शिवसेनेत ऐनवेळी प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना देण्यात आले होते. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने आपली ताकत संजय शिंदे यांच्या पाठीशी उभी केली होती. या निवडणुकीत पाटील यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला.
दरम्यान,हा पराभव विसरून पुन्हा एकदा नारायण पाटील सक्रीय झाले असून जेव्हा कधी निवडणूक होईल तेव्हा पुन्हा एकदा पाटील यांना शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची आशा आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त करमाळ्याचे आराध्य दैवत कमलाभवानी देवी चरणी एक किलो चांदीची तलवार पाटील यांच्या हस्ते अर्पण केली.यावेळी त्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाची आणि सेनेच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
करमाळा तालुक्यातील शिवसेनेचा प्रभाव वाढविण्यासाठी आपण काम करीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील राहिलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे स्पष्ट मत पाटील यांनी व्यक्त केले.
तर ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असुन नारायण पाटील यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण तालुक्यात शिवसेनेचा झंझावात उभा करु असा दावा महेश चिवटे यांनी केला आहे.
पराभवानंतर देखील पाटील यांनी सेनेच्या शीर्षस्थ नेत्यांच्या गाठीभेटी सूरच ठेवल्या आहेत. नारायण पाटील यांनी भगवा कधीही खाली ठेवला नाही. काही व्यक्तींनी चुकीची माहिती दिल्याने त्यांचे तिकीट कापले गेले होते मात्र आता पुन्हा एकदा विधानसभेसाठी आतापासूनच जोमाने कामाला लागण्याचे त्यांना आदेश प्राप्त झाल्याचा दावा चिवटे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकोपयोगी कामांसाठी उदयनराजेंची धडपड; केंद्रीय मंत्र्यांच्या भेटींचा लावला धडाका
एक दोन नव्हे तर तब्बल 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार
- उदयनराजेंना मिळणार गडकरींची साथ; महामार्गाच्या सहा पदरीकरणास लवकरच होणार सुरूवात
- भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; अक्षर पटेल दुसऱ्या कसोटीसाठी फिट
- “इंग्लंड आणि भारत यांच्यातील टेस्ट सिरिजचं नाव तेंडुलकर-कुक ठेवलं जावं”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

