बीड: गेल्या महिन्यात २८ मे या तारखेला अनिल आबासाहेब जगताप या वनरक्षक अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती. या आत्महत्येचे कारण आता स्पष्ट झाले असून पत्नीच्या छळला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पत्नी आश्विनीसह तिचे आई-वडील व भावाविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला. शिरूर तालुक्यात वनरक्षक असलेले अनिल जगताप यांनी मुगगाव रोडवर झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली.
त्यांचे वडील आबासाहेब जगताप यांच्या फिर्यादीवरून पत्नी आश्विनी अनिल जगताप हिच्यासह तिचे वडील आजिनाथ देवराव भवर, आई विजूबाई देवराव भवर व भाऊ महेश आजिनाथ देवराव भवर (तिघेही रा. देसूर) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला.’लग्नाअगोदरच्या पगाराचा हिशेब दे’ म्हणून आश्विनी अनिल जगताप यांचा सतत छळ करीत होती. तसेच आई-वडिलांना पैसे दिले म्हणून तीने पतीला मारहाणही केली.
जमीन, प्लॉट नावावर कर म्हणून सतत तगादा लावत होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ती कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे कारण काढून माहेरी गेली. पतीने बोलविल्यानंतर प्लॉट व जमीन नावावर केल्याशिवाय आपण येणार नाही असे तिने पती अनिलला बजावले. अखेर सततच्या या जाचाला आणि पत्नीच्या या छळाला कंटाळून अखेर वनरक्षक अनिल जगताप यांनी आपले आयुष्य संपवण्याचे ठरवले.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस मंत्र्याचे आवाहन, ‘केंद्राने राज्यासाठी दिलेल्या ‘या’ निधीचा लाभ घ्या’
- थकबाकीबाबत स्पष्टीकरण नसल्याने ठेवीदार हायकोर्टात जाण्याच्या तयारीत
- राजकीय खलबतं सुरु ; फडणवीस आणि पाटील यांची तासभर बंद दाराआड चर्चा
- ‘पवारांचा हा काही पहिला प्रयत्न नाही, तर…’; पवार-किशोर भेटीवर काँग्रेसची खोचक प्रतिक्रिया
- ‘सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी नवे नियम’, मोदी सरकारची संयुक्त राष्ट्रात भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

