🕒 1 min read
बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही बँक ताब्यात घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुदत संपूनही कोरोनामुळे बँकेची निवडणूक लांबणीवर पडली होती. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईत बैठका घेतल्यात. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस अगोदरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
५ वर्षापूर्वी भाजपच्या तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर व आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या पॅनलने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक लढवली. यात १९ पैकी १६ जागा जिंकून बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. तर दुसरीकडे तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात पॅनलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले होते. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुरेश धस व आमदार जयदत्त क्षीरसागर हे पंकजा मुंडेंच्या आघाडीत असल्याने मुंडे यांच्या पॅनलने १६ जागा मिळवल्या होत्या.
सध्याच्या निवडणुकीत चित्र उलटले आहे. सध्या महायुतीचे सरकार नाही आणि पंकजा मुंडे यां विरोधात आहेत. त्यांच्या बाजूने भाजपचे रमेश आडसकर, माजी आमदार आर. टी. देशमुख, आमदार सुरेश धस, सुभाष सारडा, माजी आमदार भीमराव धोंडे, आमदार लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा हे नेते आहेत. या नेत्यांची त्यांना मोट बांधावी लागणार आहे. यावरच जिल्हा बँकेत त्यांच्या पॅनलच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्तांनी घेतली लस
- #Breaking : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्र्याची करोडो रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- Fact Check : अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळला ?
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
