नवी दिल्ली : बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यशाळेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत बोलत असताना, महिला वापरत असलेल्या जीन्सबाबात त्यांनी आक्षेप घेतला आहे. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत’असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होत.
रिप्ड जीन्स संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य कोणालाही न पटणारे आहे. यामुळे अनेक महिला नेत्या आणि मुली तसेच सेलिब्रेटीने यावर प्रतिक्रिया दिल्या असून रावत यांच्या विधानाचा निषेध केला आहे. त्यांनतर आता सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भात सल्ला दिला आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती एस.रविंद्र भट यांच्या खंडपीठाने देखील देशातील सर्व न्यायाधीशांना आणि वकिलांनी महिलांच्या कपड्यांबाबत संवेदनशील रहायचा सल्ला दिला आहे. एका प्रकरणावर सुनावणी करताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने लैंगिक हिंसाचाराचा आरोप असलेल्या एका आरोपीला तक्रारदार महिलेकडून राखी बांधून घेण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या या आदेशाला चुकीचं ठरवले आणि अशा प्रकारच्या आदेशामुळे पिडीत महिलेच्या अडचणी वाढू शकतात असेही सांगितले.
या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, न्यायाधीशांनी आणि वकिलांनी लैंगिक समानता आणि महिलांच्या प्रती संवेदनशीलता राखावी. महिलांनी काय परिधान करावं आणि त्यांनी समाजात कसं वागावं यावर टिप्पणी करु नये. या प्रकरणावर देशातील सर्व न्यायाधीशांना आणि वकिलांना संवेदनशील बनवण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. नव्या न्यायाधीशांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जेन्डर सेन्सिटायझेशन या विषयावर भर देण्यात यावा असेही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
तसेच महिलांशी संबंधित प्रकरणावर सुनावणी करताना काही ठराविक वक्तव्य अथवा मत व्यक्त करु नयेत असाही सल्ला दिला आहे. महिला या शारिरीकदृष्ट्या दुर्बल असतात, त्यांना संरक्षणाची गरज असते, त्या स्वत: चा निर्णय स्वत: घेऊ शकत नाहीत, पुरुष कुटुंब प्रमुख असतो, महिलांनी आपल्या पवित्रतेचे ध्यान राखलं पाहिजे, मातृत्व महिलांचे कर्तव्य आहे, रात्री एकटे फिरणे म्हणजे बलात्काराला निमंत्रण देण्यासारखं आहे, महिलांनी दारू किंवा सिगारेट पिणे म्हणजे पुरुषांना उत्तेजित करण्यासारखे आहे अशा काही टिप्पणी अथवा मत न्यायाधीशांनी व्यक्त करु नयेत असे सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही’
- निर्णायक लढतीत भारताचा विजय; मालिकेतील आव्हान कायम
- औरंगाबाद मध्ये कोरोनाचा विस्फोट; गुरुवारी आढळले १५५७ कोरोनाबाधीत
- मराठी आभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापटला यांना कोरोनाची लागण
- एमबीए आणि तेही क्रिकेटमध्ये? ऑस्ट्रेलीया क्रिकेटने सादर केली संकल्पना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
